आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले असून तिथे जेएनयूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. मात्र फडणवीस त्याठिकाणी पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात जेएनयू कँम्पसमध्ये SFIचं आंदोलन सुरु झालं. हे आंदोलन महाराष्ट्रातील मराठी हिंदी वादावरुन आंदोलन झाल्याच सांगण्यात येत आहे.
याचपार्शवभूमीवर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मातृभाषेचा अभिमान आहे, पण इतर भाषाचा सन्मान ठेवला पाहिजे. मराठी सोबत भारतीय भाषा यायला हव्या. तामिळ भाषेचा देखील स्वाभिमान वाटला पाहिजे. मराठी माणूस कधीच संकुचित वागू शकत नाही. मराठे स्वतःकरिता लढत नव्हते, भारतीय संस्कृतीसाठी मराठे लढले. काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची एलर्जी आहे, पण काळजी करू नका. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच ओळखला जाणार आहे".