थोडक्यात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे विरोधकांवर मिश्किल टीका केली आणि रवी राणा यांचं भरभरून कौतुक केलं.
फडणवीस म्हणाले की, "रवी राणा यांचा प्रचार करण्याची गरज नाही, कारण त्यांचं काम मोठं आहे आणि प्रत्येकाच्या मनात ते आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला मारताना फडणवीस म्हणाले, "तुमच्या डोक्याचे नट आम्ही कसायचं आहे, आणि वेळ पडल्यास आम्ही हा पाणा नेऊ," असा खोचक इशारा त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे सभा पार पडली. या सभे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर मिश्किल टीका करत रवी राणा यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. रवी राणा यांचा प्रचार करण्याची गरज नांही. कारण त्यांचं काम मोठं आहे. प्रत्येकाच्या मनात रवी राणा आहेत. रवी राणा यांचं चिन्ह पाना जोरदार आहे असं ते म्हणाले. तसच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट आम्हाला कसायचे आहे. त्यासाठी वेळ पडल्यास आम्ही हा पाणा नेऊस असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
रवी राणा यांचा प्रचार करण्याची गरज नाही कारण त्यांचं काम मोठं आहे. प्रत्येकाच्या मनात रवी राणा आहेत. रवी राणा यांचं चिन्ह पाना जोरदार आहे. आम्हाला अनेकांचे नट कसायचे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट आम्हाला कसायचे आहे. त्यासाठी वेळ पडल्यास आम्ही हा पाणा नेऊ. भाजपला 152 जागा मिळाल्या त्यापैकी 4 जागा इतर पक्ष्यांना मिळाली त्यापैकी 1 जागा त्यांना दिली.
रवी राणा त्यांचं बोधचिन्ह पाना आहे, कोना कोनाचे नट कंचतील माहीत नाही,आम्हाला देखील विरोधकांचे नट काचायचे आहे, त्यासाठी तुमच्या पाण्याची आवश्यकता पडेल, अस म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सर्व प्रकारचे प्रयत्न बंद केल्यानंतर मविआचे लोक हायकोर्टात गेले. लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न केले. मुलीच्या शिक्षणाची चिंता करायची नाही, मुलींचे मामा मुंबईला बसले आहे. आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात की तुम्ही घरी बसा मी तालुक्याला जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही जास्त पैसे खर्च कराल, दारू प्याला, अस सांगत सर्वात जास्त महिला अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास करत आहे.
मी तुमचा पाना का मागितला? सर्व प्रकारचे प्रयत्न बंद केले तर हायकोर्टमध्ये गेले व हायकोर्ट वाल्यानी सांगितलं की योजना बंद होणार नाही, म्हणून रवी राणा तुमचा पाना द्या या महाविकास आघाडी विरोधकांचे नट कचन्यासाठी असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
आम्ही अमरावतीमध्ये मोठया प्रमाणात काम केली यासाठी रवी राणा, नवनीत राणा भाजपच्या पाठीशी उभे राहिले, आमची भाजपा तुमच्या पाठीशी आहे. आमचा एकच धर्म आहे महायुतीचा धर्म आहे. जो पक्षाने महायुतीचे जो उमेदवार दिला आहे त्याच्या मागे उभे राहायचे आहे. अमरावतीमध्ये सुलभा खोडके यांच्या मागे भाजपा उभी आहे अस ते म्हणाले.