Devendra Fadnavis Tweet Google
ताज्या बातम्या

राज्यात नदी पातळी आणि धरणांच्या पाण्याच्या विसर्गाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवर दिली माहिती

राज्यात नदी पातळी आणि धरणांतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवर सविस्तर माहिती दिली आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Tweet : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई विभागात अतिमुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती. पुण्याचं खडकवासला धरण तुडुंब भरल्यानं नदी-नाल्यांना पूर आला होता. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळी 47 फूट 6 इंच झाली असल्याची माहिती फडणवीसांनी ट्वीटरवर दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?

नदी पातळी आणि विसर्गाची स्थिती अशी.

सिंचन विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे.

(दि. 27 जुलै 2024/सायं. 5 वाजता)

1) खडकवासल्यात 82.58 टक्के पााणीसाठा आहे. कालव्यातून विसर्ग 1005 क्युसेक इतका होत आहे.

2) कोयनेत धरण पाणीसाठा 78.28 टक्के इतका आहे. नदी विसर्ग 32,100 क्युसेक इतका होतो आहे.

3) सांगलीतील आर्यविन पूल येथील पाणीपातळी 40 फूट 5 इंच इतकी असून, अलमट्टी धरण पाणी पातळी 516.20 मीटर इतकी आहे.

4) कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळी 47 फूट 6 इंच इतकी आहे. राधानगरी धरण विसर्ग 7121 क्युसेक इतका आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली

Tejaswini Pandit emotional post : "तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन...." आईच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीची भावूक पोस्ट

Mumbai Cha Raja New record : मुंबईच्या राजाच्या नावावर जागतिक विक्रम : ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’चा मानाचा मुकुट

Supriya Sule On Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे आक्रमक; सत्ताधाऱ्यांना अधिवेशन बोलवण्याची मागणी