राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासह अनेक पिके वाहून गेली असून शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्या पत्रात फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. याच दाखल्यावर ठाकरे म्हणाले, "तेव्हा तुम्ही मागणी केली होती, आज सरकारमध्ये असताना तीच मागणी का मान्य करत नाही? ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा."
ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनता त्रासात आहे, पण सरकार निष्क्रिय आहे. "मुख्यमंत्री जाहिरातींमध्ये व्यस्त आहेत आणि उपमुख्यमंत्री पाकिटांवर फोटो छापण्यात मग्न आहेत," अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, "मोठ्या उद्योगपतींचं आणि साखरसम्राटांचं कर्ज माफ होतं, पण साधा शेतकरी कर्जासाठी बैलजोडी किंवा पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवतो. शेतकरी भाजपमध्ये गेला तरच कर्जमाफी मिळणार का?" असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी काही मागण्या केल्या. त्यात
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत,
सातबारा कोरा, कर्जमाफी,आणि तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे,
या प्रमुख मागण्या आहेत.