थोडक्यात
सांगलीच्या बाजारपेठेत देवगडचा आंबा दाखल
हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा दाखल
तब्बल अडीच हजार रुपये इतका डझनाच्या पेटीला दर
संजय देसाई, सांगली
कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा सांगलीच्या बाजारात दाखल झाला आहे. हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा हा पोहोचला आहे.
पहिल्याच आंब्याच्या सौद्यात कुणकेश्वर इथल्या हापूस आंब्याला तब्बल अडीच हजार रुपये इतका डझनाच्या पेटीला दर मिळाला आहे.
सध्या 2 पेट्यांची आवक झाली असून बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी पार पडलेल्या आंबा सौद्यात चांगला दर मिळाला आहे.