ताज्या बातम्या

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या महत्त्वाकांक्षी 'धडक 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला

Published by : Rashmi Mane

निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या महत्त्वाकांक्षी 'धडक 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळत आहे. 2018 साली आलेल्या 'धडक' चित्रपटाचा हा सिक्वल असून 'धडक'मधून ज्येष्ठ दिवंगत कलाकार श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरनं सिनेसृष्टीत पदार्पण केले असून अभिनेता ईशान खट्टर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'धडक' हा सिनेमा 2016 साली आलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ब्लॉकबस्टर 'सैराट' या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. मराठीत 100 कोटी क्लबमध्ये समावेश झालेला 'सैराट' हा पहिला चित्रपट ठरला असून या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. सैराटचं कथानक, अभिनय, गाणी, संगीत सर्वच लोकप्रिय ठरलं होतं. मात्र करण जोहरच्या धडकनं प्रेक्षकांची लोकप्रियता कमवण्यात यश मिळवले नसून हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता सात वर्षांनंतर त्याचा सिक्वल 'धडक 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धडक 2' मध्ये प्रमुक भूमिकेत सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी दिसत असून चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केलं आहे. ट्रेलरवरून हा चित्रपटदेखील जातीपातीच्या विळख्यात अडकलेली लव्हस्टोरी असल्याचे दिसून येतं आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. त्यामुळे ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावणार की 'धडक' प्रमाणेच प्रेक्षक याही चित्रपटाला नाकारणार हे 'धडक 2' प्रदर्शनानंतरच समजेल.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा