मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्याने चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना आता मोठा झटका बसला. त्यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कौटुंबिक न्यायालयाने मान्य करत त्यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टाने मान्य केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत धनंजय मुंडे यांच्याविरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी दरमहा 15 लाख रुपयांची पोटगी मुंडे यांनी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टामध्ये सुरूवातील करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत का, यावर युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे.
निकालचे मुद्दे
कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा 1 लाख 75 हजार आणि त्यांच्या मुलीला 75 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आलेला 25 हजार रुपयांचा खर्च देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत.
कोर्टाच्या निकालावर मीडियाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, एका मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीविरोधात ही लढाई होती. मी खूप सोसले आहे. मी 1996 पासून त्यांच्यासोबत आहे. माझ्या कुटुंबासाठी 15 लाख रुपये पोटगी मागितली होती. त्यासाठी हायकोर्टात जाणार आहे. मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी होती. माझे उत्पन्न काही नाही. माझ्या नवऱ्याने जी गाडी दिली होती, ती माझ्याकडून घेऊन त्यांच्या वकिलाला दिली. येरवडा, बीड कारागृहात मला डांबण्यात आले होते. गाडीत रिव्हॉल्वर ठेवण्यात आले होते.