बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, ज्या देशमुखांची निर्घुण हत्या झाली. ज्यांनी कुणी हत्या केली. त्यांना शासन झालं पाहिजे. ते फासावर गेले पाहिजे. या मताचा पहिल्या दिवसापासून मी तो ही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे.
मला ही त्याच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत. त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कोणीही असो. कोणाच्याही, कितीही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्यालासुद्धा सोडायचे नाही. हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणे याच्यामागे काय राजकारण असू शकते. हे आपण समजू शकता.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, वाल्किक कराड सुरेश धस यांच्यासुद्धा जवळचे होते. माझ्याजवळचे ते आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचीही चौकशी पोलीस करते आहे. पारदर्शकतेपणाने चौकशी झाली पाहिजे. या मताचा मी आहे. त्यामुळे शासन कुणालाही पाठिशी घालत नाही. हे प्रकरण भयंकर आहे. त्याचा फास्टट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा चालू केला पाहिजे. चार्जशीट लवकर दाखल केलं पाहिजे. असे धनंजय मुंडे म्हणाले.