ताज्या बातम्या

'गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे? कशी? बैठक झाली हे व्हिडीओ देऊ शकतो…' धनंजय मुंडे यांचा शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

Published by : shweta walge

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या शरद पवार यांच्या वाटाघाटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. धनंजय मुंडे हे पुरंदरला आले होते. यावेळी त्यांनी हे खळबळजनक विधान केले आहेत.

शरद पवारांबाबत गोप्यस्फोट करत म्हणाले की, साहेब आजही आमच्यासाठी आदरणीय आहेत. आमचे जाणते राजे आहेत. संपूर्ण रयत जाणत्या राजाचं कुटुंब असतं. त्यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं. त्याला संस्कार म्हणायचं आणि दादांनी केलं त्याला गद्दारी म्हणायची का? 2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे? कशी? बैठक झाली हे व्हिडिओसहीत मी देऊ शकतो. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या. हे त्यांनी केलं. ते संस्कार दादांनी केलं तर गद्दारी, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी चढवला.

शिवसेनेला आम्ही भाजपपासून लांब केलं. ती आमची चाल होती आणि उद्धव ठाकरे हसतायत. किती ही हतबलता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 53 पैकी 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं. त्यांनी कागदावर सह्या केल्या होत्या. दादा हा कागद तुम्हाला दाखवतील की नाही माहीत नाही. पण कधी तरी मी तो कागद दाखवणार आहे, असं धनजंय मुंडे म्हणाले.

ज्यांना प्रतिष्ठा द्यायची होती त्यांना प्रतिष्ठा दिली. मी अजितदादांना ओळखतो. अजितदादांनी आजपर्यंत पवार साहेबांच्या थुका ओलांडून कधी राजकारण केलं नाही. जे काय केलं असेल ते त्यांच्या सांगण्यावरूनच केलं, त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाहीत. दादांना सांगायचं एक, करायचं दुसरं आणि झालं तिसरं की दादा खलनायक, असा हल्लाच त्यांनी शरद पवारांवर चढवला.

सुप्रिया सुळेंवर टीका करत म्हणाले की, या मतदारसंघाच सगळं वैभव फक्त सेल्फी काढण्यात घालायचे का? संसदरत्न पुरस्कार फक्त गोडाऊनमध्ये ठेऊन या मतदारसंघाचा विकास होणार आहे का? इथे बापू एक एक टीएमसीचा हिशोब करायला लागले आहेत. समोरचा भलेही संसदरत्न असेलं, त्याला टीएमसी लिटरमध्ये सांग असं म्हटल्यावर सांगता येईल?, असा टोला धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

ते पुढे म्हणाले की, ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान कोण होणार ही ठरवणारी आहे. ही निवडणूक माझ्या मराठवाड्याच्या मातीसाठी प्रतिष्ठेची आहे. घरी सून आली तरी आपण तिला लेक मानतो. या शिकवणीचा 2024 च्या निवडणुकीत कुठेतरी विसर पडायला लागलेला आहे. संकुचित मनोवृत्ती या निवडणुकीत व्हायला लागलेली आहे. या निवडणूकीत देशाचं भवितव्य ठरवायचं आहे की एका परिवाराचं भवितव्य ठरवायचयं? हे या निवडणुकीत ठरवायला लागेल, असं मुंडे म्हणाले.

धाराशिव या दुष्काळी जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये पवारांच्या घरी जी आमची मराठवाड्याची लेक सून म्हणून दिली गेली, ज्या सुनेला आज बाहेरच म्हटलं जातं. या सुनेवर टीका करताना एक मनात विचार आणा, दादांचा शुभविवाह 1985 साली झाला. सुनेत्रा वाहिनी सून म्हणून आल्या. हे जवाबदारीने मी बोलतोय. 1985 ला सुनेत्रा वहिनींचे पाय जेव्हा बारामतीला लागले, त्यानंतरच खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास चालू झाला, असंही ते म्हणाले.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा