ताज्या बातम्या

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचं अखेर ठरलं..? फेसबुकवर फोटोसोबत मजकूर, नेमकं काय लिहिलं ?

रवींद्र धंगेकर यांनी फेसबुकवर नवा फोटो आणि मजकूर पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. जाणून घ्या त्यांनी नेमकं काय लिहिलं.

Published by : Prachi Nate

रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर फार चर्चेत आले. त्या भेटी दरम्यान त्यांनी हे स्पष्ट केल होत की, ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेण्यात आली होती. अस असताना रवींद्र धंगेकर यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल.

ज्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं होत आणि 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' असा मजकूर देखील लिहलेला होता. या स्टेटसमुळे धंगेकर पुन्हा चर्चेत आले. रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता त्या चर्चांना रविंद्र धंगेकर यांनी पुर्णविराम दिल्याचे त्यांच्या फेसबुक फोटोवरून आणि त्यावरील मजकूरावरून दिसून येत आहे.

त्यांनी फेसबुक प्रोफाईलचा फोटो बलला आहे तर या फोटोमध्ये त्यांनी भगवी टोपी आणि भगवा उपरणं परिधान केल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांनी मजकूरात 'हे नाव पुन्हा ऐकण्याची तयार ठेवा' असं लिहल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धंगेकर पक्षबदल करण्याची शक्यता आहे. पण यामुळे आता राजकीयवर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश