ताज्या बातम्या

धारावीत सिलिंडर स्फोट प्रकरण; 9 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले. स्त्याच्याकडेला बेकायदेशीरपणे दुहेरी पार्किंगमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उभा करण्यात आला होता. सोमवारी रात्री अचानक गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत सुमारे 9 ते 10 गाड्यांचे नुकसान झाले आहे.

या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेत सुमारे 40 सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेवेळी पोलीस आणि अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी तैनात होते.

याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक बेकायदेशीर डबल पार्किंगमध्ये उभा असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?