धारावी पुनर्विकास योजनेत बहु-मॉडेल वाहतूक केंद्राची सुरुवात ही एक गेमचेंजर ठरू शकते. या संबंधीत सूत्रांचे म्हणणे आहे की, सर्व विद्यमान मेट्रो कॉरिडॉरना जोडणारे मेट्रो इंटरचेंज स्टेशन असणारे धारावी हे मुंबईतील पहिले आणि कदाचित एकमेव ठिकाण बनविण्याच्या योजना सुरू आहेत.
"धारावी सेंट्रल मेट्रो स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव आहे, जे पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण कनेक्टर आणि विविध प्रकारच्या वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य इंटरचेंज पॉइंट बनू शकते. ते बहु-स्तरीय स्टेशन म्हणून नियोजित आहे," असे समजते.
धारावी आधीच एका अनोख्या ट्रान्झिट क्रॉसरोडवर वसलेले आहे. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण कॉरिडॉर एकमेकांना जोडतात, ज्यामुळे ते शहर-स्तरीय वाहतूक इंटरचेंजसाठी एक आदर्श स्थान बनले आहे. हे मेट्रो लाईन 3, पश्चिम आणि मध्य रेल्वेजवळ आहे आणि आगामी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल टर्मिनलपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.
पुनर्विकास योजनेत गतिशीलता त्याच्या डिझाइनच्या केंद्रस्थानी असल्याचे म्हटले जाते. ज्यामध्ये धारावीच्या मध्यवर्ती स्थानाचा फायदा घेतला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या, वाहतुकीचा अडथळा असलेले हे ठिकाण कार्यक्षम, एकात्मिक शहरी वाहतुकीचे मॉडेल बनणार आहे.
"पुनर्विकासानंतर लोकसंख्येची घनता अपेक्षित असल्याने, येथे सार्वजनिक वाहतूक सुधारणा केवळ महत्त्वाचे नाही तर ते आवश्यक आहे. धारावीत मेट्रो लाईन 11 च्या प्रस्तावित विस्तारामुळे परिसराला वाहतूक-केंद्रित विकासात उन्नत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होईल," असे सांगितले जाते.
मेट्रो लाईन 11आणि शहरातील प्रमुख रस्त्यांच्या चौकात मल्टी-मॉडल हबची योजना आखली जात आहे, ज्यामध्ये रेल्वे, मेट्रो, फीडर बसेस आणि सायकलिंग तसेच चालण्याचे मार्ग यांसारख्या नॉन-मोटराइज्ड वाहतुकीचा समावेश असेल. याला पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक परिसरांना मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी जोडणारे फीडर बस मार्ग देखील नियोजित केले जात आहेत, जेणेकरून कोणताही प्रवासी वंचित राहू नये.