CM Eknath Shinde  Lokshahi
ताज्या बातम्या

Dharmaveer 2 Trailer:'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; CM एकनाथ शिंदे म्हणाले, "धगधगता भुतकाळ पडद्यावर..."

धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खाननं या ट्रेलर लाँचच्या इव्हेंटला खास उपस्थिती दर्शवली होती.

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde On Dharmaveer 2 Trailer launch : शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रविड तरडे यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाचा बोलबाला संपूर्ण सिनेसृष्टीत रंगला असतानाच आता धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खाननं या ट्रेलर लाँचच्या इव्हेंटला खास उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उद्या गुरुपोर्णिमा आहे. पण ती गुरुपोर्णिमा आजच झाल्यासारखी वाटत आहे. कारण माझे साहेब मला प्रत्यक्षात इथे भेटले आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे. यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक हा चित्रपट काढला आणि २०२२ सालचा तो मराठीतील ब्लॉकबस्टर ठरला. यासाठी मी प्रविण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश देसाई, प्रसाद ओक या सर्व टीमचं अभिनंदन करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून दिघे साहेबांचा जीवनपट लोकांसमोर आला. दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की, ते एका चित्रपटातून पूर्ण होऊ शकणार नाही.

यासाठी आम्ही धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. त्यांनी एक धगधगता भुतकाळ पडद्यावर आणला आहे. जीवनातील सत्य त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं होतं की, एका सिनेमात ते शक्य नाही. म्हणून दुसरा पार्ट टू सिनेमा केला आहे. आनंद दिघे साहेबांचे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यात आहे. आनंद सिनेमातील एक डायलॉग आहे.

आनंद मरते नही, आनंद मरा नही करते, तसच विचार मरत नसतात. विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचाऱ्यांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो. बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अशी कामे केली आहेत, जी अनेकांना माहित नाही. ठाण्यात त्यांचं कार्यक्षेत्र आणि कर्तृत्व सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा