ताज्या बातम्या

Ajit Pawar : लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल

पुण्यातील मंचर येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Published by : Varsha Bhasmare

पुण्यातील मंचर येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती केली असून त्यांचा थेट सामना शिंदे गटाच्या शिवसेनेशी होणार आहे. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, सतत आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे अजित पवार पुन्हा एकदा वादग्रस्त प्रश्नामुळे चर्चेत आले आहेत. सभेत बोलताना त्यांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना थेट, “तुमचं लव्ह मॅरेज झालंय का?” असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात असल्याने हा प्रश्न विचारल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली असून विरोधकांनीही यावर टीकेची झोड उठवली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मोनिका बाणखेले यांना दिली आहे. मोनिका बाणखेले पुर्वच्या मोनिका बेंड या उमेदवार फारदेशीर आहेत. मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे. बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय? असा मिश्लिक सवाल विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. सासर आमि माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नका, असी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान त्याचवेळी मंचरमधील निवडणूकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना विनोदी शैलीत चिमटा काढला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाषण संपवताना ‘आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील’ अशी घोषणा केली. मात्र अजित पवार यांनी लगेचच कंद यांना आधी बोलण्याची संधी देण्याची विनंती केली.

यावेळी अजित पवारांनी प्रदीप कंद यांची ओळख खास पद्धतीने करून देण्यास सांगितले. “पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष,” अशी ओळख करुन द्यावी, असा चिमटा त्यांनी हसतखेळत काढला. दिलीप वळसे पाटील यांनीही त्याच सुरात ही ओळख करून दिल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्स्फूर्त हास्याची लहर पसरली. निवडणूक वातावरणात झालेला हा हलकाफुलका प्रसंग आता स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

२ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचर येथील सभेत आपल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्ष टीका केली. मंचरचा विकास कोण करू शकतो, असा सवाल उपस्थित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची नावे घेतली. मात्र, महायुती सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी मुद्दामहून टाळल्याचे स्पष्ट दिसले. मंचर नगरपंचायतीत शिंदे गटाच्या शिवसेनेशी थेट सामना असल्यामुळे अजित पवारांनी नामोल्लेख टाळतच शिंदेंवर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा