ताज्या बातम्या

राम सेतू खरंच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

राम सेतुवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटानंतर यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान राम यांनी सीतेची सोडवणूक करण्यासाठी भारतातून श्रीलंकेला जाण्यासाठी हा पूल बांधला होता. याच पार्श्वभूमीवर हरियाणातील भाजपा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी संसदेत एक प्रश्न विचारला की, भारताच्या इतिहासातील गोष्टींची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली जाणार आहे का? आत्तापर्यंत समुद्रातल्या ज्या अवशेषांना राम सेतू म्हटलं जातंय, तो खरंच राम सेतू आहे का? यासंदर्भातही त्यांनी संसदेला माहिती दिली.

यावर उत्तर देत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे की, “राम सेतुसंदर्भात बोलायचं, तर त्यात आमच्या काही मर्यादा आहेत. कारण यासंदर्भातला इतिहास जवळपास १८ हजार वर्षांपूर्वीचा आहे. आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी ५६ किलोमीटर इतकी आहे”,“मात्र, त्या ठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचं सातत्य आपल्याला दिसून येतं. त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील”, असे ते म्हणाले.

यासोबतच त्यांनी सांगितले की, असं जरी असलं, तरी तिथे नेमका पूलच होता किंवा त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं, हे नेमकं सांगता येणं कठीण असल्याचं सिंह म्हणाले. “त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं हे नेमकं सांगता येणं कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र, असं म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होतं”, अशी त्यांनी माहिती दिली आहे.

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना