थोडक्यात
रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?
योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांची जोरदार हल्ला चढवला आहे. रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब (Anil Parab) यांनी केली. 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिहे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला. याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटतं नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होती. त्यामुळं ही जबाबदारी माझ्याकडे होतो. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो. आता 14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी का केली नाही. गेली 12 वर्षे का तोंड बंद होतं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा आहे. बाळासाहेब यांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का? त्याला जे काय कुणी सांगितलं आहे ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. कुठलाही मृतदेह दोन दिवस शव पेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी हे शक्य नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.
रामदास कदम यांचे 100 अपराध झालेले आहेत, ज्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे, मुख्यमंत्री का वाचवत आहेत? अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवत आहात. एवढे अपराध, डान्सबार चालवतात, वाळूचोर आहेत, दादागिरी करताय, जमिनी लाटतायंत, माझ्याकडे सगळी प्रकरणे आली आहेत. कोणाकोणाच्या जमिनी, घरे, यांनी खाल्ली आहेत. कोणाकोणाला दादागिरी करुन बेघर केलेले आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या का केली? याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे, त्याचे देखील कारण बाहेर आलं पाहिजे, अशी मागणीही अनिल परब यांनी केले.