ताज्या बातम्या

अनावश्यक मोरी रद्द करण्यासाठी दिगस ग्रामस्थांचे आमरण उपोषण

पूर्णपणे खराब झालेल्या रस्त्यावर सदरचा निधी खर्च करण्यात यावा. अशी मागणी डीगस ग्रामस्थांची आहे.

Published by : Sagar Pradhan

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: डीगस घाण्याची वाडी येथील सुस्थितीत असलेल्या मोरीची उंची न वाढवता त्या ऐवजी डीगस चोरगेवाडी- हिंदेवाडी- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे. या मागणीसाठी डीगस ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले.

कुडाळ तालुक्यातील डीगस- चोरगेवाडी- हिंदे वाडी- हिर्लोक हा इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरण करणे हे काम मंजूर झाले आहे. सदर मंजूर कामाचा निधी डीगस -चोरगेवाडी- हिंदे वाडी- हिर्लोक रस्त्यावरील डीगज घाण्याची वाडी येथे मोरीची उंची वाढविण्यासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे. मात्र ज्या मोरीची उंची वाढवली जाणार आहे ती मोरी सुस्थितीत असून मोरीची उंची वाढविण्याचे आवश्यकता नाही. सदर रस्त्याचा काही भाग हा पूर्णपणे उकडून गेलेला आहे त्या ठिकाणी मजबुतीकरण व डांबीकरण करणे आवश्यक आहे. असे असताना मोरीची उंची वाढवण्यासाठी रस्ता दुरुस्तीचा निधी अनावश्यक खर्च करण्यात येत आहे. तरी पूर्णपणे खराब झालेल्या रस्त्यावर सदरचा निधी खर्च करण्यात यावा. अशी मागणी डीगस ग्रामस्थांची आहे.

यासाठी आज ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन केले. यावेळी डीगस ग्रामस्थ रमेश घोगळे, नित्यानंद कांदळगावकर, बुद्धनाथ गोसावी, अरुण सावंत, श्रीराम परब, योगश सावंत, सचिन सावंत, उदय घोगळे, संदीप धावले, आदिसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या आंदोलनाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, ब्रिगेडियर सुधीर सावंत, दादा साहिल, प्रभाकर सावंत, यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर संबंधित बांधकाम कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्याशी चर्चा करून सदरील रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या मागणीनुसार करण्यात यावे. यासाठी मद्यस्थी केली. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी संबंधित ग्रामस्थांना लेखी पत्राद्वारे रस्त्याचे काम प्राधान्याने केले जाईल. त्या साठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल .असे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी डीगस ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा