ताज्या बातम्या

वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉ. दिलीप मस्केंवर हल्ला

वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉ. दिलीप मस्केंच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • कळमनुरीत डॉ. दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला

  • सभा आटपून परत येताना वाहनावर दगडफेक

  • हल्ल्यामध्ये दिलीप मस्के गंभीर जखमी

वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉ. दिलीप मस्केंच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. सभा आटपून परत येताना वाहनावर दगडफेक करण्यात आली असून हल्ल्यामध्ये दिलीप मस्के गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

रात्री एक वाजताच्या सुमारास सेलसुरा फाटा जवळ हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये दिलीप मस्के गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

या हल्ल्यामध्ये डॉ. दिलीप मस्के यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला आहे. त्यामुळे त्यांना सुरुवातीला हिंगोलीत एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. हा हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद