थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Shetty) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
या आधी अभिनेता सलमान खानच्या घरावर अशाच प्रकारे गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता रोहित शेट्टीचे घरावर हा गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार नेमका कोणी केला. याचा तपास आता पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे.परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार
शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला आहे
जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही