X Flu Outbreak 
ताज्या बातम्या

आफ्रिकेत एक्स आजाराचं थैमान, 140 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती

आफ्रिकेत एक्स आजाराचं थैमान पाहायला मिळत आहे. 140 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. WHO ने ७ महिन्यांपूर्वीच अलर्ट जारी केला होता. लहान मुलांना धोका अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

कोरोनानंतर आणखी एका रोगाने थैमान घातलं आहे. आफ्रिकेत एक्स आजाराचं थैमान पाहायला मिळतं आहे. या आजारामुळे आफ्रिकेतील विविध भागांमध्ये 140हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

WHO ने ७ महिन्यांपूर्वीच जारी केला होता अलर्ट

जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजाराबद्दल 7 महिन्यांआधीच अलर्ट जारी करण्यात आला होता. खूप कमी माहिती उपलब्ध असल्यानं या आजाराला अद्याप कोणतंही विशेष नाव देण्यात आलेलं नाही. 2018 मध्ये पहिल्यांदाच एक्स रोगाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, हा नेमका काय आहे, हे अद्यापही कळू शकलेलं नाही.

काही भागात, लोकांना फ्लू सारखी लक्षणे दिसत होती आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आफ्रिकेच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये एक्स आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 386 पैकी जवळपास 200 रुग्ण हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत, अशी माहिती आफ्रिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना या रोगाची बाधा अधिक असल्याचं दिसत आहे. श्वासाद्वारे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या रोगाचं वेगानं संक्रमण होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. तसंच हा आजार वेगानं पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट