दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी एफआयआर दाखल केल्याने एक नवीन वळण मिळाले आहे. वकील नीलेश ओझा यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. नीलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केलेल्या तपासणीमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थांच्या व्यवसायामध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचे वकील म्हणाले.