ताज्या बातम्या

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण, वडील सतीश सालियन यांची सुप्रीम कोर्टात धाव

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टात वडील सतीश पोहचले आहेत, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध मोदींकडे तक्रार दाखल केली असून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या विरोधातील देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • दिशा सालियन मृत्यू प्रकरण

  • वडील सतीश सालियन यांची सुप्रीम कोर्टात धाव

  • उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध मोदींकडे तक्रार

  • सतीश सालियन यांच्याकडून पंतप्रधानांकडे तक्रार

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला.दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टात वडील सतीश पोहचले आहेत, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध मोदींकडे तक्रार दाखल केली असून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या विरोधातील देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी तक्रार दाखल केली आहे

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा