ताज्या बातम्या

शिवसेना महिला नेत्यावर चाकू हल्ला प्रकरणी जिल्हा प्रमुखचं संशयाच्या घेऱ्यात, चौघांना अटक

Published by : shweta walge

गोपाल व्यास |वाशिम: शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी यांना पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेण्यासाठी गेले असता, त्याची प्रकृती अस्वास्थ्यामुळे अकोला येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र त्यांचे दोन भाचे व अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या नव्यानेच नियुक्त झालेल्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान भर दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर,वाशिमच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलविण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या पोटात व छातीत चाकू हल्ल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. हल्ल्यात बचाव करताना त्यांच्या हाताच्या नसाही कापल्या गेल्या होत्या.

दरम्यान या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला मदत करणाऱ्या अब्दुल जुबेर अब्दुल जब्बार, अब्दुल वाजीद उर्फ गोऱ्या या दोन आरोपीला अटक केली होती, त्याच्या चौकशीतून जिल्हाप्रमुख सुरेश मापारी त्यांचे भाचे नितीन कावरखे, भगवान शंकर वाकुडकर, यांचे नावं समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तर जिल्हाप्रमुख सुरेश मापारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारा मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहे.

रंजना पौलकर यांनी या आधीच २६ सप्टेंबरच्या आसपास शहर पोलीस स्टेशन वाशिम येथे त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार जिल्हाप्रमुख सुरेश मापरीची निकटवर्तीया विरुद्ध नावानिशी दिली होती. मात्र शहर पोलीस स्टेशन कडून अदखलपात्र तक्रार नोंदवून पौळकर यांची फक्त बोलवण करण्यात आली होती. त्या तक्रारीचा व आत्ता झालेल्या हल्ल्याचा काही सबंध आहे का याचाही पोलिस करत आहेत. त्यासाठीच मापारी यांच्या दोन भाच्यालाही पोलिसांनी त्याब्यात घेतल्याची माहिती आहे.

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक

Dada Bhuse : नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा

GT VS KKR: गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द! गुजरात संघ प्लेऑफमधून बाहेर

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल