थोडक्यात
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिवाळी सण
18 ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात
18 ते 26 दिवाळी सण आणि सुट्ट्या
यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिवाळी सण आला आहे. परंतु, सरकारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांची नजर भिंतीवरील सरकारी, महापालिकेच्या कॅलेंडरवर नजर खिळून राहिली आहे. 18 ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असून 23 ऑक्टोबर रोजीपर्यंत भाऊबीज आहे. अपवाद 19 ऑक्टोबर रोजी रविवारची सुट्टी आहे. 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी असूनही सुट्टी नाही. मात्र, तेवढी सुट्टी सरकारने जाहीर करण्याची कर्मचारी वर्गाकडून मागणी होत आहे.
लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीजेची सार्वजनिक सुट्टी त्यानंतर अनुक्रमे 21, 22, 23 ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे सरकारी, महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. तर, 24 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी नसली तरी त्या दिवशी एक दिवसाची सुट्टी टाकल्यास सरकारी, महापालिका कर्मचाऱ्यांना 18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर अशी सलग 9 दिवसांची सुटी मिळणार आहे. दिवाळी खरेदी करणे, दिवाळीच्या फराळाची, रोषणाईची, भाऊबीज आणि पाडव्याची पूर्व तयारी करणेत्यामुळे त्यांना सुलभ होणार आहे.
दिवाळी सण मनमुरादपणे साजरा करून त्यानंतर 24 ते 26 ऑक्टोबर या तीन दिवसांत मुंबईपासून जवळच्या ठिकाणी अथवा राज्यातील आवडीच्या पर्यटनस्थळी सहकुटुंब, मित्र परिवारासह फेरफटका मारणे, पिकनिकची मजा लुटणे शक्य होणार आहे. दिवाळी साजरी करणे आणि त्यातूनही मनमुराद आनंद लुटणे शक्य होणार आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे दिसते. दुसरे म्हणजे वर्षभर कामाचा ताण, त्यातच लोकसभा, विधानसभा निवडणूक कामाचा ताण येणे यामुळे संबंधित सरकारी, महापालिका कर्मचारी सतत मानसिक तणावाखाली काम करीत राहतात. जानेवारी महिन्याच्या निवडणुकीचे कामकाज सरकारी आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना त्यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करावे लागत आहे.
18 ते 26 दिवाळी सण आणि सुट्ट्या
शनिवार 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, सार्वजनिक सुट्टी
19 ऑक्टोबर रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी
20 ऑक्टोबर सोमवार रोजी नरक चतुर्दशी, सुटी नाही (सरकारने सुटी देण्याची अपेक्षा)
21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन (दिवाळी अमावस्या) सार्वजनिक सुट्टी
22 ऑक्टोबर रोजी बुधवार बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, सार्वजनिक सुट्टी
23 ऑक्टोबर रोजी गुरुवार भाऊबीज, सुट्टी
24 ऑक्टोबर रोजी शुक्रवार सुट्टी नाही
25 ऑक्टोबर रोजी शनिवारची सारावाजानिक सुट्टी
26 ऑक्टोबर रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी