ताज्या बातम्या

ज्ञानराधा घोटाळ्याचा तपास आता सीआयडीकडे; 2 लाख ठेवीदारांचे 3,317 कोटी रुपये अडकले

राज्यभरात प्रचंड गाजलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या तपासात मोठी घडामोड घडली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यभरात प्रचंड गाजलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या तपासात मोठी घडामोड घडली आहे. आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेला तपास आता थेट गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ लेखी आदेश जारी होण्याची प्रतीक्षा आहे.

घोटाळ्याचा मोठा फटका ठेवीदारांना

ज्ञानराधा पतसंस्थेचे मुख्यालय बीड येथे आहे. तिच्या राज्यभरात तब्बल 51 शाखा कार्यरत होत्या. संस्थेच्या कारभारात झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे सुमारे 2 लाखांहून अधिक ठेवीदारांचे 3,317 कोटी रुपयांचे गुंतवणूक रक्कम अडकली आहे. यामुळे अनेक नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कुटे व संचालकांची मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेला गती

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुरेश कुटे कुटुंबियांसह संचालक मंडळाच्या 80 मालमत्तांवर 'एमपीआयडी' (Maharashtra Protection of Interest of Depositors Act) अंतर्गत जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सादर केलेला प्रस्ताव शासनाकडून मंजूरही झाला आहे.

ईडीचीही कारवाई; पैसे हाँगकाँगला

या प्रकरणात केंद्र सरकारच्या आर्थिक तपास यंत्रणा (ED) नेही लक्ष घातले आहे. ईडीच्या प्राथमिक तपासात कुटे यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे हाँगकाँगमध्ये ट्रान्सफर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गडद झाले असून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आर्थिक गुन्हा असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विधानसभा अधिवेशनातही चर्चा

ज्ञानराधा घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची दखल विधानसभेतही घेण्यात आली होती. अनेक आमदारांनी ठेवीदारांच्या संरक्षणासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती.

ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा सुरूच

दरम्यान, ठेवीदार संघटनांनी न्याय मिळवण्यासाठी आंदोलने सुरू ठेवली असून, आता तपास सीआयडीकडे गेल्यामुळे गुन्हेगारांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा