Do you need to pay for using Whatsapp how much will be subscription what is ad freee usage know everything 
ताज्या बातम्या

WhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे?

आज मोबाईलशिवाय दिवस जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसतो आणि त्यात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ॲप म्हणजे WhatsApp.

Published by : Riddhi Vanne

आज मोबाईलशिवाय दिवस जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसतो आणि त्यात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ॲप म्हणजे WhatsApp. पण आता याच WhatsApp बाबत एक धक्कादायक बदल समोर येतोय.

लवकरच WhatsApp पूर्णपणे मोफत राहणार नाही, अशी शक्यता आहे. कंपनी जाहिरातमुक्त वापरासाठी पैसे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच, फ्री वापरायचं असेल तर जाहिराती पाहाव्या लागतील आणि जाहिराती नको असतील तर खिशाला कात्री लागणार!

नवीन अपडेटच्या कोडमधून असं दिसून येतं की स्टेटस आणि चॅनेलमधील जाहिराती काढून टाकण्यासाठी वेगळं पेड प्लॅन असू शकतं. मेटाकडून यावर अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी ही योजना लवकरच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पैसे भरल्यावर वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त WhatsApp अनुभव मिळेल. मात्र यासाठी किती शुल्क द्यावं लागेल, कोणते अतिरिक्त फायदे मिळतील किंवा ही सुविधा कधी सुरू होईल, याबाबत अजून माहिती नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे – WhatsApp वापरण्याचा अनुभव आता दोन प्रकारचा असू शकतो.

थोडक्यात

  1. आजच्या काळात मोबाईलशिवाय दिवस जाणं अशक्य

  2. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन

  3. स्मार्टफोनवर सर्वाधिक वापरलं जाणारं ॲप म्हणजे WhatsApp

  4. दैनंदिन संवादासाठी WhatsApp वर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व

  5. मात्र आता WhatsApp संदर्भात एक धक्कादायक बदल समोर येत आहे

  6. या बदलाचा परिणाम लाखो वापरकर्त्यांवर होण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा