Donald trump give good news to Indian people Donald trump give good news to Indian people
ताज्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांसाठी ऐतिहासिक निर्णय; व्हिसा प्रक्रियेत मोठा बदल

भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Published by : Riddhi Vanne

(Donald trump give good news to Indian people ) भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता पासपोर्ट, व्हिसा, ओसीआय तसेच इतर दूतावासाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना जास्त काळ थांबावे लागणार नाही.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेने व्हिसा धोरणांमध्ये अनेक बदल केले होते. काही देशांतील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले असले तरी, भारतीय नागरिकांसाठी मात्र सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लॉस एंजेलिस येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने एक नवीन “इंडियन कॉन्सुलर सर्व्हिस सेंटर” सुरू करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या संख्येने भारतीयांना थेट फायदा होणार आहे.

हे नवीन केंद्र 15 डिसेंबर 2025 पासून कार्यरत झाले आहे. व्हीएफएस ग्लोबल या संस्थेमार्फत या केंद्राचे संचालन केले जात आहे. दक्षिण कॅलिफोर्निया आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लॉस एंजेलिसच्या मध्यवर्ती भागात, 800 साउथ फिग्युरोआ स्ट्रीट, सुईट 1210 येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

हे कार्यालय सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी काही सेवा शनिवारीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या नव्या केंद्रामध्ये भारतीय नागरिकांसाठी लागणाऱ्या जवळपास सर्व दूतावासी सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टशी संबंधित कामे, व्हिसा सेवा, ओसीआय अर्ज आणि इतर आवश्यक कॉन्सुलर सुविधा येथे दिल्या जाणार आहेत. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा