अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक कडक निर्णयांचा फटका मारला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प आणखी एक महत्त्वाच पाऊल उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे. जगातील 41 देशांना अमेरिकेत प्रवेश बंदी करणार असल्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याच समोर येत आहे. इतर देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवासावर निर्बंध लावणार असल्याचा नवीन निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेणार आहेत.
यामध्ये सध्या उच्च राजनैतिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून यावर विचार सुरु आहे. परराष्ट्र विभाग, गृह सुरक्षा विभाग आणि इतर गुप्तचर संस्थांचे अधिकारी याबाबतचा आढावा घेत असून यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यामध्ये रेड यादी करण्यात येईल, या यादीत समावेश असणाऱ्या देशांच्या नागरिकांना प्रवेशापासून पूर्णपणे बंदी घातली जाईल. तसेच एक ऑरेंज यादी करण्यात येणार आहे ज्यात गैर-व्यावसायिक प्रवाशांवर निवडक निर्बंध लादेल, आणि शेवटी येलो यादी या यादीत ज्या देशांना सुरक्षा कमतरता दूर करण्यासाठी किंवा अधिक प्रतिबंधात्मक यादीत ठेवण्याचा धोका आहे, त्यांना 60 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येईल. अशा तीन श्रेणींमध्ये विभाग करून देशांची नावे दिली आहेत.
रेड यादीत कोणत्या देशांचा समावेश?
रेड यादीत 10 देशांचा समावेश करण्यात येणार येईल. अफगाणिस्तान, भूतान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला या देशांचा समावेश असेल.
ऑरेंज यादी कोणते देश?
ऑरेंज यादीत देखील 10 देशांचा समावेश करण्यात येणार येईल. या यादीत बेलारूस, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार, पाकिस्तान, रशिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश असेल.
येलो यादीत कोणत्या देशाचा समावेश?
पिवळ्या यादीतील देशांमध्ये प्रामुख्याने आफ्रिका, कॅरिबियन, अंगोला, अँटिग्वा, बारबुडा, बेनिन, बुर्किना फासो, कॅमेरून, केप व्हर्दे, चाड, काँगो प्रजासत्ताक, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, डोमिनिका, विषुववृत्तीय गिनी, गांबिया, लायबेरिया, मलावी, माली, मॉरिटानिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, साओ टोमे आणि प्रिन्सिपे, वानुआतु आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.