ताज्या बातम्या

Sana Malik : 'दुबार मतदानावर दमदाटी नको, पडताळणी करा' सना मलिक यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी मतदान, पैसे वाटप, दुबार मतदान तसेच निवडणुकीतील विजयाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. सना मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वप्रथम मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

Published by : Varsha Bhasmare

मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मतदानाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी मतदान, पैसे वाटप, दुबार मतदान तसेच निवडणुकीतील विजयाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. सना मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वप्रथम मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. अधिकाधिक मतदान झाले, तर लोकशाही अधिक मजबूत होईल,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. निवडणूक हा लोकशाहीचा सण असून, या सणात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे त्या म्हणाल्या.

निवडणूक काळात होणाऱ्या पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलताना सना मलिक यांनी कठोर भूमिका घेतली. “संविधान न मानणारे लोकच अशा प्रकारचे कृत्य करतात. निवडणूक हा सण आहे, तो विकत घेण्याचा प्रकार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून, निवडणूक आयोग आणि संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दुबार मतदान आणि तथाकथित ‘भगवा गार्ड’च्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सना मलिक म्हणाल्या की, “कोणतीही दमदाटी किंवा दबाव टाकण्याची भूमिका योग्य नाही. दुबार मतदानाचा संशय असल्यास संबंधित मतदाराची योग्य पद्धतीने पडताळणी (verification) करावी आणि निर्णय घ्यावा.” अशा प्रकरणांमध्ये थेट पोलिसांकडे संबंधित व्यक्तींना सोपवावे, असेही त्यांनी नमूद केले. सध्या तरी दुबार मतदानाबाबत कोणतीही ठोस तक्रार आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीतील विजयावर विश्वास व्यक्त करताना सना मलिक म्हणाल्या, “यावेळी आम्ही अत्यंत नियोजनबद्ध तयारी केली आहे. या तयारीच्या जोरावर आम्ही आजवरचा रेकॉर्ड ब्रेक करत अधिकाधिक जागा जिंकू.” त्यांनी ठामपणे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. मराठी महापौराबाबत विचारले असता सना मलिक म्हणाल्या, “संविधानानुसार आणि लोकशाही प्रक्रियेनुसार मुंबईचा महापौर होईल.” कोणताही भेदभाव न करता संविधानालाच सर्वोच्च मानले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा