Admin
ताज्या बातम्या

मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी - एनसीपीए दरम्यान धावणार; तिकीट पाहा किती?

मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार आहेत. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. बसमध्ये सीट बेल्ट, स्पीकर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत.

एका वेळी 65 लोक बसून प्रवास करु शकतात. तर 15 ते 20 लोक उभे राहून प्रवास करु शकतात. मार्च अखेरीस 50 डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. बेस्टकडून भाडेतत्त्वावर ई-डबल डेकर बस खरेदी केल्या जात आहेत. 2022 मध्ये एक बस सुरु करण्यात आली आणि मुंबईसाठी अशा एकूण 900 बसेस आणण्याची योजना आहे.

बेस्टच्या ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी