(Ladki Bahin Yojana) महायुती सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. या योजनेच्या लाभार्थींना आता एक महत्वाची माहिती मिळाली आहे. सध्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत या प्रक्रियेसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशीरा झाल्यामुळे लाडक्या बहिणींना 'डबल गिफ्ट' मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र 3000 रुपये दिला जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा या योजनेवर परिणाम होणार नाही, अशी स्पष्टता प्रशासनाने दिली आहे. महत्वाची सूचना: 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.