आज सर्वत्र आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रास्ते बंद असणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. ही वाहतूक कुठे बंद असणार आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते :
एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च पर्यत एक दिशा मार्ग राहिल. तसेच स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक पर्यंत वाहतुकीकरिता बंद राहिल.त्याचप्रमाणे रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात येईल. ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस.व्ही.एस. रोड जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहिल आणि सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने माहिम जंक्शन येथून एल. जे. रोड मार्गे वळविण्यात येतील.
वाहतुकीचा मार्ग दक्षिण वाहीनी द्रुतगतीने बांद्रामार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते केमकर चौक पुढे ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात. अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असेल.
उत्तर वाहिनी वरून कुलाबा तसेच सी.एस.एम.टी. मार्गे जाणाऱ्या वाहनांनी पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे, अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असेल.
उत्तर वाहिनीवरुन महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून जाणाऱ्या वाहनांनी डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेवून सेनापती बापट मार्गे पर्यायी मार्ग असेल.
पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक या वाहनांसाठी वडाळा ब्रिजचा वापर करुन बरकत अली नाका, बी. पी.टी. कॉलनी, पूर्व मुक्तमार्गाचा वापर करावा.