ताज्या बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : 'शिपाई नाही तर पाणी नाही' - बाबासाहेबांच्या कठीण दिवसांची कहाणी, जाणून घ्या

आजच्या पिढीला जर देशाची जुनी ओळख करुन द्यायची असेल तर बाबासाहेबांबद्दलच्या काही गोष्टी माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

Published by : Shamal Sawant

आज म्हणजे 14 एप्रिल रोजी भारतीय संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी 32 पदव्या मिळवल्या. आजही जगातील अनेक विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारले गेले आहे. त्यांचे विचार आजही पाळले जातात. एक कायदेतज्ञ असूनही त्यांची एक जगभरात एक द्रष्ट नेता म्हणून त्यांची ओळख होती. मात्र त्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती नसलेल्यादेखील दिसून येतात. आजच्या पिढीला जर देशाची जुनी ओळख करुन द्यायची असेल तर बाबासाहेबांबद्दलच्या काही गोष्टी माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव :

डॉ. बाबासाहेब आंबेकडर हे मूळचे कोकणातील आंबडवे गावचे. त्यांचा जन्म मात्र मध्यप्रदेशमध्ये झाला. बाबासाहेबांचे नाव आधी भीवा सकपाळ होते. मात्र कोकणामध्ये आडनावावरुन नाव ठेवण्याची पद्धत असे. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील गव्हर्नमेंट स्कूलमध्ये झाले. त्यावेळी बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांचे शाळेत नाव नोंदवत असताना भीमराव रामजी आंबडवेकर असे ठेवले. मात्र बाबासाहेबांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बदलले. आंबवडेकर हे आडनाव थोडे कठीण असल्याने त्यांनी म्हणजे शिक्षक केशव आंबेडकरांनी आपले आंबेडकर हे सुटसुटीत आडनाव दिले. आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले त्या ठिकाणी असलेल्या रजिस्टरमध्ये त्यांनी 'भिवा रामजी आंबेडकर' अशी स्वाक्षरी केली होती. त्यांची स्वाक्षरी असलेले रजिस्टर आजही शाळेने जपून ठेवले आहे.

शाळेत शिक्षण घेतानाचे 'ते' कठीण दिवस :

सातारा येथील सातारा हायस्कूल मधील इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1904 मध्ये रामजी आंबेडकरांनी सहपरिवार मुंबई ला जाण्याचा निर्णय घेतला. रामजी सहपरिवार मुंबई मधील लोअर परळ भागात राहू लागले. मुंबई मधील 'एल्फिन्स्टन हायस्कुल' मध्ये बाबासाहेबांचे नाव दाखल केले. एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा मोठ्या प्रमाणात अनुभव आला. शाळेमध्ये बाबासाहेबांना इतर मुलांपेक्षा वेगळं बसावे लागत होतं. बाबासाहेबांना हायस्कूल मध्ये पाणी पिण्यासाठी असलेल्या भांड्याला किंवा पेल्याला हात लावू दिला जात नव्हता.

त्या शाळेतील शिपाई बाबासाहेबांना उंचीवरून ओंजळीत पाणी टाकायचा आणि मग बाबासाहेब पाणी प्यायचे. शिपाई जर सुट्टीवर असेल तर बाबासाहेबांना दिवसभर पाणीसुद्धा मिळत नव्हतं. या घटनेची नोंद करताना बाबासाहेब म्हणतात कि "शिपाई नाहीतर पाणी नाही". एवढच नव्हे तर अस्पृश्य म्हणून बाबासाहेबांना संस्कृत विषयसुद्धा घेता आला नव्हता. त्या जागी बाबासाहेबांनी पर्शीयन विषय निवडला होता. मात्र जिद्दीने बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपले एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा