RSS संघाच्या दसरा सोहळ्यात डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या RSS संघाच्या दसरा सोहळ्यात डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या
ताज्या बातम्या

RSS संघाच्या दसरा सोहळ्यात डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या

दसरा सोहळा: डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या, अमरावतीत ५ ऑक्टोबरला संघाचा कार्यक्रम.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी सोहळा यंदा ५ ऑक्टोबर रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आणि स्व. रा. सू. गवई यांच्या पत्नी डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अमरावतीतील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होणार असून संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य जे. नंदकुमार हे प्रमुख वक्ते असतील. गवई यांना दिलेलं निमंत्रण स्वीकारल्याची माहिती संघातून देण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर कमलताई गवई कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एक पत्र फिरू लागलं होतं. मात्र ते पत्र खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर गवई परिवारातील राजेंद्र गवई यांनी प्रतिक्रिया देताना, “आईसाहेब कोणताही निर्णय घेतील, त्यामागे मी खंबीरपणे उभा आहे. विचारधारा वेगळी असली तरी संबंध कायम राहतात. यामुळे विचारधारेत बदल होत नाही,” असं सांगितलं.

स्व. रा. सू. गवई यांचे संघाशी संबंध नवीन नाहीत. १९८१ साली ते संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्या वेळचे छायाचित्रही प्रकाशित झाले होते. त्यामुळे गवई परिवार आणि संघाच्या व्यासपीठावरचा हा संवाद पहिल्यांदाच घडत नाही.

या निमंत्रणावरून विविध चर्चा रंगत असल्या तरी गवई परिवाराने आतापर्यंत समाजिक सौहार्दाला प्राधान्य दिलं असल्याचं दिसून आलं आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी अमरावतीत होणाऱ्या संघाच्या विजयादशमी सोहळ्यात डॉ. कमलताई गवई प्रत्यक्ष उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब

Pune Accident : भोर-महाड मार्गावर जीवघेणा अपघात; खड्ड्यात कार कोसळून मुंबईकराचा मृत्यू

Siddhivinayak Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायकचा बाप्पा; ट्रस्टकडून 'इतक्या' कोटींची मदत जाहीर

Maharashtra Flood : मराठवाड्यात अतिवृष्टी ! तब्बल 104 जणांचा घेतला बळी