थोडक्यात
त्रिभाषा समितीचे डॉ. नरेंद्र जाधव घेणार उद्धव ठाकरेंची भेट
आज दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर घेणार भेट
त्रिभाषा समितीसंदर्भात घेणार उद्धव ठाकरेंची भेट
राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीचा सध्या अभ्यास दौरा सुरु असून यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा समिती नेमण्यात आली होती या समितीचे नरेंद्र जाधव अध्यक्ष आहेत.
नरेंद्र जाधव आणि समिती सध्या महाराष्ट्र दौरा करत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई दौरा आहे ट्या अगोदर समितीच्या वतीने राजकीय नेत्यांच्या भेटी सुरु आहेत. मनसे आणि शिवसेनेकडून हिंदी सक्तीला सुरवातीपासून विरोध करण्यात आला होता. त्रिभाषा समितीला आपला अहवाल 5 डिसेंबरला राज्य सरकारकडे सुपूर्द करायचा असल्याने भेटिंना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.