ताज्या बातम्या

Ranjeetsingh Nimbalkar : निंबाळकरांवर दुग्धाभिषेक अन् दृष्ट काढण्याचा प्रकार! डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपांवर सडेतोड उत्तर देत नार्को चॅलेंज

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.

Published by : Prachi Nate

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या या लढाईत आज फलटणमध्ये झालेली निंबाळकर यांची जाहीर सभा भावनिक आणि नाट्यमय क्षणांनी भरलेली होती. सभेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती दिसून आली. या महिलांनी निंबाळकरांना प्रतीकात्मक पाठिंबा देत त्यांच्या पायांना पाणी घातले, दृष्ट काढली आणि दुग्धाभिषेक केला. या दृश्यामुळे निंबाळकर हे क्षणभर भावूक झाले आणि त्यांच्याच अश्रूंनी सभागृहातील वातावरण अधिक भावनिक झाले.

सभेत निंबाळकरांनी आरोपांना थेट उत्तर देत ते संगनमताने रचले गेले असल्याचा आरोप केला. “माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या संकेतावरून झाले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तेवढं धैर्य दाखवावं. नाहीतर सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही खोटं बोललो,” असे आव्हान त्यांनी रामराजे निंबाळकरांना देत केले. “मला गोळी घातली असती तरी चाललं असतं, पण एवढी बदनामी का?” असा भावनिक सवाल त्यांनी यावेळी केला.

निंबाळकरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की त्यांचा उद्देश बदला नव्हे तर बदलाव घडवण्याचा आहे. “तालुक्यातील ६० टक्के जनता माझ्यासोबत उभी आहे,” असा दावा त्यांनी केला. विधान परिषदेतील एका आमदारावर अप्रत्यक्ष टीका करत ते म्हणाले, “एका आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली आहे. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “मी त्यांना मातीसाठी भेटलो, वैयक्तिक काही मागितले नाही.”

डॉक्टर प्रकरणातील एका मुकादमाच्या वैद्यकीय तपासणीबद्दल त्यांनी आरोग्यअधिकारी संपदा मुंडे यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला त्याची मेडिकल तपासणी झाली नाही. तरी तो म्हणतो की मुंडेंनी मेडिकल केलं. हे राजकीय षड्यंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला.

फलटणमधील ही सभा केवळ राजकीय नव्हे तर भावनिक लढाईचे चित्र घेऊन समोर आली. समर्थकांच्या श्रद्धेचा उत्कट आविष्कार, निंबाळकरांचे थेट आव्हान आणि आरोप-प्रत्यारोपांनी या प्रकरणाला आणखी तीव्रतेची धार दिली आहे. आता तपास आणि पुढील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने वळतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट फलटणचा राजकीय पट आता अधिक तापला आहे आणि ही लढाई आणखी चुरशीची होणार हे निश्चित.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा