Draupadi Murmu
Draupadi Murmu Team Lokshahi
ताज्या बातम्या

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू, विजय मिळाल्यास पहिल्या आदिवासी राष्ट्रपती

Published by : Team Lokshahi

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. द्रौपदी मुर्मू यांचे नाव एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नड्डा यांनी दिली. द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या तर देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरणार आहे.

draupadi murmu and narendra modi

मंगळवारी संध्याकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर मुर्मू यांच्या नावावर एकमत झाले. संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित होते.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू

झारखंडच्या नवव्या राज्यपाल असलेल्या ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशातील मयूरभंजच्या आहेत. ओडिशातील रायरंगपूरमधून त्या आमदार झाल्या आहेत. राज्यपाल बनलेले ते पहिले ओडिया नेते आहेत. याआधी २००२ ते २००४ या काळात त्या भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपालही आहेत.

विरोधकांकडून यशवंत सिन्हा

माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवले आहेत. सिन्हा यांचे नाव निश्चित झाल्यावर त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. 27 जून रोजी सकाळी 11.30 वाजता आम्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत विरोधकांच्या बैठकीत दिली.

भाजपने का केली द्रौपदी मुर्मू यांची निवड

देशातील 47 एसटी राखीव लोकसभेच्या जागा आहेत. यामुळे देशातील आदिवासींना संदेश देण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात भाजप ओडिशा विस्ताराअंतर्गत मुर्मू यांच्या नावाचा उपयोग करेल. शिवाय महिला उमेदवार असल्याचे महिला सबलीकरणाचाही संदेश देशात जात आहे. एकंदरीत भाजपने एकाच दगडात दोन पक्षी उडवल्याचे पाहायला मिळत आहे.

18 जुलै रोजी निवडणूक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपतीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 जून आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार