Dioxide Water : सकाळी उपाशीपोटी 'हे' पाणी प्या; वजन घटेल, डायबिटीस व कोलेस्टेरॉलवरही होईल नियंत्रण Dioxide Water : सकाळी उपाशीपोटी 'हे' पाणी प्या; वजन घटेल, डायबिटीस व कोलेस्टेरॉलवरही होईल नियंत्रण
ताज्या बातम्या

Dioxide Water : सकाळी उपाशीपोटी 'हे' पाणी प्या; वजन घटेल, डायबिटीस व कोलेस्टेरॉलवरही होईल नियंत्रण

उपाशीपोटी पाणी: वजन कमी, डायबिटीस व कोलेस्टेरॉलवर नियंत्रणासाठी खास उपाय.

Published by : Team Lokshahi

सध्या बदलती जीवनशैली, चुकीचे आहारपद्धती आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजनवाढ, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलसारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मात्र, स्वयंपाकघरातील काही घरगुती उपाय या तक्रारींवर परिणामकारक ठरू शकतात. रोज सकाळी उपाशीपोटी एक खास प्रकारचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यासह इतर आजारांवरही फायदेशीर परिणाम होतो.

पाणी तयार करण्याची पद्धत:

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे, एक चमचा बडिशेप, एक चमचा ओवा आणि एक इंच दालचिनीचा तुकडा टाकून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून उपाशीपोटी प्यावे. हा उपाय नियमित केल्यास पचनक्रिया सुधारते, चयापचय (मेटॅबोलिझम) क्रिया वाढते आणि शरीरात चरबी साचण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, पोटावरची चरबी कमी होते आणि वजन घटण्यास मदत होते.

उपायाचे इतर फायदे:

१. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत

२. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत

३. पीसीओडी, पीसीओएसच्या तक्रारींमध्ये फायदा

४. गर्भाशयातील फायब्रॉईडच्या त्रासावर नियंत्रण

भारतीय पारंपरिक आहारशैली ही नैसर्गिक आरोग्यवर्धक तत्त्वांवर आधारित आहे. मात्र अलीकडील बदलांमुळे हे घरगुती उपाय पुन्हा नव्याने स्वीकारण्याची गरज आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा