Dudhsagar Water Falls Team Lokshahi
ताज्या बातम्या

Dudhsagar Water Falls : पृथ्वीवरचा स्वर्ग! व्हिडियो पाहून मंत्रमुग्ध व्हाल...

पृथ्वीची गळाभेट घेणारा स्वर्ग' गोवा आणि बेळगावच्या दरम्यान रेल्वेमार्गावर असलेल्या देशातल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे.

Published by : Team Lokshahi

दुधाचा झरा, दुधाचा सागर… गोव्याचा दूध सागर धबधबा अशाच अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. आपल्या आगळ्या सौंदर्याने आकर्षून घेणारा हा धबधबा देशविदेशातल्या लोकांवर जादू करतो. केंद्रिय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डीने दूध सागर धबधब्याचा एक खास व्हिडिओ शेयर केला आहे.

सोशल मीडिया कू (Koo) App वर काहीच काळात व्हायरल झाला. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी शेयर केलेल्या या मनमोहक व्हिडिओवर लोकसुद्धा विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक या जागेला जगातली सर्वात सुंदर जागा म्हणत आहेत, तर अनेकांना हे दृश्य अविश्वसनीय वाटते आहे. किशन रेड्डी यांनी स्वतः आपल्या शब्दांत या धबधब्याचे कौतुक केले आहे.

किशन रेड्डीने दूधसागर धबधब्याचा मनमोहक व्हिडिओ शेयर करत लिहिले, की 'पृथ्वीची गळाभेट घेणारा स्वर्ग' गोवा आणि बेळगावच्या दरम्यान रेल्वेमार्गावर असलेल्या देशातल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. तुम्हाला निसर्गाचा चमत्कार अनुभवायचा असेल तर या अविस्मरणीय स्थळाला भेट नक्की द्या.’

दूधसागर धबधबा गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे. दूध सागर धबधबा भारताच्या सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. याची उंची थेट एक हजार फुटांहून जास्त (310 मीटर) आहे. हा धबधबा गोव्याची राजधानी पणजीपासून 60 किलोमीटर आणि मडगाव शहरपासून 46 किलोमीटर आहे. कर्नाटकच्या बेळगांव पासून तो जवळपास 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

दूधसागर धबधबा गाठायचा असेल तर रस्ता आणि रेल्वे स्टेशनच्या मार्गे जाऊ शकता. गोव्यामधूनही खासगी कारने तुम्ही जाऊ शकता. गोवाहून दूधसागरसाठी बसही जाते. ट्रेनने जायचे असेल तर कॅसल रॉक रेल्वे स्टेशन जवळ आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक