ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : मराठवाड्यावर पाणीसंकट? जायकवाडी धरणाचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन; 12 तासात सुमारे 6 दिवसांच्या पाण्याची वाफ

मराठवाड्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या जायकवाडी धरणातून शुक्रवारी (2 मे) तब्बल 2.035 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले.

Published by : Team Lokshahi

मराठवाड्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या जायकवाडी धरणातून शुक्रवारी (2 मे) तब्बल 2.035 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. ही आकडेवारी केवळ चिंताजनक आहे. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे.

सध्या जायकवाडीमध्ये सर्वाधिक 39 टक्के उपयुक्त साठा आहे. मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे या साठ्यावर बाष्पीभवनाचा गंभीर फटका बसतोय. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने बाष्पीभवनात झपाट्याने वाढ झाली आहे, आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत ही स्थिती अधिकच गंभीर होणार आहे.

सध्या संपूर्ण मराठवाड्यातील 11 मोठ्या जलप्रकल्पांमध्ये केवळ 22 टक्के म्हणजे 1453 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जायकवाडीचा वाटा मोठा असला, तरी वाढते बाष्पीभवन हा साठा झपाट्याने कमी करत आहे. पाणी नियोजनाच्या दृष्टीने हे संकेत गंभीर असून, प्रशासन आणि नागरिकांनी जलसाक्षरतेकडे वळण्याची ही अत्यंत गरजेची वेळ आहे. अन्यथा यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्याला तीव्र जलटंचाईचा सामना करावा लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा