सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि दिलासा दायक बातमी आता समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर झालं असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 25 बेसेस पॉईंटने घट होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 6 टक्के झाला आहे. ज्याच्या परिणाम हा व्याज दरावर होऊन EMI कमी होणार आहे. सर्वसामान्यांना गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होऊ शकते. दरम्यान याचा फायदा केवळ फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्यांनाच होणार आहे. याची अधिकृत माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे.
रेपो रेटच्या कपातीमुळे EMI किती कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग दुसऱ्यांदा त्यांनी सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी ठरणारे. रेपो रेट 25 बेसिस पॉईंटच्या कपातीत आल्यामुळे रेपो रेट 6 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जर तुमच्या होमलोनचा व्याजदर 8.5 च्या दराने असेल तर तो 8.85 टक्कांवर येईल.
उदाहरणार्थ 30 लाख आणि 50 लाख रुपयांच्या होमलोनच्या हिशोबाने पाहायच झालं तर, कर्जाच्या परतफेडीचे हे गणित 20 वर्षांच्या आधारावर केलं जाणार आहे. म्हणजे, जर तुम्ही 30 लाखांचे होमलोन घेतलं आणि त्याचा व्याजदर हा 8.5 टक्के इतका असेल, तर तुमचा EMI 26,035 इतका असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये तुम्हाला दरमहा 25,562 रुपये EMI भरावे लागतील. अशा प्रकारचं गणित पकडून चाललो तर तुम्हाला एका महिन्यात 473 रुपये कमी मोजावे लागतील आणि त्याचसोबत वर्षाच्या हिशोबाने 5,676 रुपयांचा फायदा तुम्हाला मिळेल.
३० लाखांवर EMI, 9 टक्क्यांच्या हिशोबाने तुम्ही 26,247 रुपये भरत असाल तर रेपो रेटच्या कपातीनुसार तुम्ही महिन्याला 1,176 रुपयांची बचत करु शकणार, त्यामुळे 20 वर्षात 2.82 लाखांची बचत तुम्ही करु शकतात.
५० लाखांवर EMI सध्या 43,745 रुपये इतका आहे. पण रेपो रेटच्या कपातीनुसार तो 41,785 इतका होईल. त्यामुळे रेपो रेटच्या कपातीनुसार तुम्ही महिन्याला 1,960 रुपये बचत होणार असून 4.70 लाखांची बचत होणार आहे.
70 लाखांवर EMI सध्या 60,243 रुपये इतका आहे. तर रेपो रेटच्या कपातीनुसार तो 58,499 इतका होईल. त्यामुळे रेपो रेटच्या कपातीनुसार 6.58 लाखांची बचत होणार आहे.
1 कोटी कर्जावर EMIसध्या 87,490 रुपये इतका आहे. तर रेपो रेटच्या कपातीनुसार तो 83,570 इतका होईल. त्यामुळे त्यामुळे रेपो रेटच्या कपातीनुसार तुम्ही महिन्याला 3,920 रुपये बचत होणार आहे.
1.5 कोटी EMIसध्या 1,31,235 रुपये इतका आहे. तर रेपो रेटच्या कपातीनुसार तो 1,25,355 इतका होईल. त्यामुळे त्यामुळे रेपो रेटच्या कपातीनुसार तुम्ही महिन्याला 5,880 रुपये बचत होणार आहे.
रेपो दर म्हणजे काय?
आरबीआयकडून ज्या दराने बँकांना कर्ज दिलं जातं त्याला रेपो रेट म्हणतात. यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ होते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो. जर रेपो दरात घट झाली तर बँकाही आपला कर्जाचा व्याजदर कमी करुन ग्राहकांना दिलासा देऊ शकतात.