ताज्या बातम्या

26/11 Mumbai Terror Attack: या 'हिरो'मुळे भारताला मिळाला होता 26/11चा सर्वात मोठा पुरावा 'कसाब'

मुंबईवरील आज त्या घटनेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती.

Published by : Team Lokshahi

Mmubai 26/11 Terror Attack: मुंबईवरील आज त्या घटनेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर, या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलिस दलातील 8 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले होते तर तुकाराम ओंबाळे या अधिकाऱ्याने पाकिस्तानचा नागरिक असलेल्या कसाबला जिवंत पकडून भारताला पाकिस्तानविरोधातील सर्वात मोठा पुरावा म्हणून मिळवून दिला होता.

दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला सुरु करताच ओंबाळे यांना वॉकी-टॉकीवरून संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत सुटल्याचा हा संदेश होता. हल्ला झाल्यावेळी ओंबाळे चौपाटीवर ड्यूटीवर होते. ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहचले. तेवढ्याच कसाब व त्याच्या साथीदारांची गोळीबार करीत गाडी येत होती. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला अडवले व पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबच्या साथीदाराने ओंबाळेवर गोळ्या झाडल्या. मात्र त्यावेळी कसाबला टाकून त्याचे साथीदार गाडीत पळून गेले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना कडवा लढा देऊन त्यांचा प्रतिकार माघारी परतवण्यात मोठी भूमिका बजावली ती पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी चौपाटीवरच प्राण सोडला मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले.

कसाब जखमी अवस्थेत तेथेच पडून राहिला. त्यामुळे पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. पुढे कसाबमुळेच हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला व भारताने पाकिस्तानचे पितळ उघड पाडले. याचबरोबर हल्ल्याला चार वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये सरकारने फासावर लटकवले. त्यामुळे ओंबाळेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी त्यांच्या धाडसामुळे कसाब हाती लागला. ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट