गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये भाव वाढ होत असताना दिसत आहे. मात्र अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टेरिफ यामुळे सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर जीएसटी सह एक लाख सात हजार एकशे वीस रुपये असून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे तर दुसरीकडे सोन्याचे दर वाढत असल्याने गुंतवणूकदारांचा मात्र मोठा फायदा होत आहे आगामी काळात सोन्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता सोने तज्ञांनी वर्तवली आहे.