pretext | marriage
pretext | marriage  team lokshahi
ताज्या बातम्या

6 महिलांशी लग्न, 7 व्याची होती तयारी, असं आलं प्रकरण उघडकीस

Published by : Shubham Tate

एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून आतापर्यंत एकूण 7 महिलांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यातून त्याने 6 महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली, 7व्या महिलेसोबत त्याने हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. (duped 7 women with upto rs 50 lakhs on pretext of marriage in telugu states arrested)

पोलिसांनी आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्ह्यातील ३३ वर्षीय अडापा शिव शंकर बाबू याला अटक केली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील सहा महिलांसोबत लग्न केले आहे. जेव्हा त्याने सातव्या महिलेशी लग्न करण्याच्या बहाण्याने 30 लाख रुपये उसने घेतले, तसेच तिचे सोने गहाण ठेवले. याबाबत सातव्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यामुळे आडपा शिवशंकर बाबूला पोलिसांनी पकडले. त्यांनी 50 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.

तपासात सुमारे 6 लग्ने उघडकीस आली

एका व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिल्याची तक्रार महिलेने गचीबाओली पोलिसांत दिली. विश्वास जिंकल्यानंतर त्याने 30 लाख रुपये उसने घेतले, मात्र त्या व्यक्तीची पार्श्वभूमी पडताळणी केली असता त्याने यापूर्वीही अनेक महिलांची फसवणूक केल्याचे आढळून आले. महिलेच्या तक्रारीवरून गचीबाओली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासादरम्यान आडपा शिवशंकर बाबू याने आणखी ६ महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

घटस्फोटित महिलांचा वापर

गचीबाओलीचे पोलीस निरीक्षक सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर बाबू घटस्फोटित महिलांना मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून टार्गेट करायचे. तो अशा महिलांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा विश्वास जिंकून त्यांची फसवणूक करायचा. त्याच्याविरुद्ध आरसी पुरम आणि केबीएचपी पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने 7 महिलांची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक केली असून त्यांचे 20 तोळे सोनेही गहाण ठेवले आहे. एवढेच नाही तर नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथून अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...