ताज्या बातम्या

Eknath Shinde Special Report : उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, मृताच्या नातेवाईकांच्या घराचं काम सुरू

एकनाथ शिंदे: पहलगाम हल्ल्यातील मृताच्या नातेवाईकांसाठी दिलेला शब्द पाळला, घराचं काम सुरू.

Published by : Riddhi Vanne

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते आहेत. कुठं काही संकट आलं, की शिंदे तिथं धाव घेत मदतीसाठी पुढाकारही घेतात. पहलगाम हल्ल्यावेळीही एकनाथ शिंदेंनी मदतीसाठी असाच पुढाकार घेतला होता. त्यावेळी तिथं पर्यटकांना ने-आण करणाऱ्या एका स्थानिकाचा मृत्यू झाला. त्याच्या घराची अवस्था बघून शिंदेंनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पाहूयात, एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द कसा पाळलाय. पाहा हा स्पेशल रिपोर्ट

जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममध्ये रक्ताचे अक्षरश: पाट वाहिले. या हल्ल्यात स्थानिक नागरिक आदिल सय्यद हुसेनही मृत्युमुखी पडला. आदिल हा अनेक वर्षांपासून खेचरावरून पर्यटकांना ने-आण करण्याचा व्यवसाय करायचा. त्यातून मिळालेल्या पैशांतून तो कुटुंबाचं पोट भरायचा. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला. याच हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाशी फोनवरून चर्चा केली. तेव्हा आदिलला घर नसल्याचं शिंदेंच्या लक्षात आलं... त्याचवेळी शिंदेंनी त्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या मदतीतून आदिलच्या कुटुंबाचं घर आकाराला येतंय. या घराचं काम आता सुरू झालंय. हे घर लवकरात लवकर बांधून पूर्ण व्हावं म्हणून शिंदेंनी शिवसेनेच्या जम्मू-काश्मिरच्या पदाधिकाऱ्यांना जातीने लक्ष घालायला सांगितलं होतं.

या घराच्या बांधकामाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आदिलच्या भावाने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. खरंतर, एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते आहेत. कुठेही काही घडलं की शिंदे तिथं जातीने धाव घेतात. आणि जितकी मदत करता येईल तेवढी करतात. हे तर झालं महाराष्ट्राचं... पण शिंदेंनी जम्मू-काश्मिरमधील मृताच्या नातेवाईकांबद्दलही मानवतेचं दर्शन घडवलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी