म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे धक्के दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादपर्यंत जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल आहे. भूकंपाचे केंद्र म्यानमार असल्याची माहिती मिळत आहे.
बँकॉकमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून या भूकंपामुळे बँकॉक आणि म्यानमार शहरांमधील मोठ्या इमारतीला हादले बसले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या जोरदार भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळाले. या भूकंपाचे थायलंडसह शेजारील अनेक देशांमध्ये धक्के जाणवले. या जोरदार भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे.