ताज्या बातम्या

Anil Ambani : अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर ईडीची छापेमारी; मुंबईसह दिल्लीत ही धाड

अनिल अंबानी समूहावर ईडीची छापेमारी पडली आहे. तसेच मुंबई-दिल्लीतील 35 ठिकाणी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरु आहे.

Published by : Prachi Nate

ईडीने 24 जुलै 2025 रोजी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि दिल्लीतील 35 हून अधिक ठिकाणी धाडी टाकून विविध आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये सुमारे 50 कंपन्या आणि 25 व्यक्ती ईडीच्या रडारवर आल्या आहेत.

ही कारवाई केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांनी दाखल केलेल्या दोन FIR वर आधारित आहे. याशिवाय नॅशनल हाऊसिंग बँक, SEBI, NFRA आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या संस्थांकडून मिळालेल्या माहितीवरही ती आधारित आहे. ED च्या प्राथमिक चौकशीत बँका, गुंतवणूकदार, आणि सार्वजनिक संस्थांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, जनतेचा पैसा योजनाबद्धपणे वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

विशेषत: Yes Bank प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आली आहे. 2017 ते 2019 दरम्यान सुमारे ₹3,000 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज व्यवहारांचे आरोप आहेत. तपासात असेही आढळले की काही कर्ज मंजूर करताना नियमबाह्य पद्धती अवलंबण्यात आली होती. कर्जाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली 'क्रेडिट अ‍ॅप्रुव्हल मेमो' मागील तारखांनी तयार करण्यात आली होती. आर्थिक तपासणी किंवा ड्युए डिलिजन्स न करताच कर्ज वितरित करण्यात आले.

ही रक्कम शेल कंपन्यांमध्ये वळवली गेली असून, काही कंपन्या आर्थिकदृष्ट्या अशक्त असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले. 'एव्हरग्रीनिंग', मंजुरीपूर्वीच पैसे हस्तांतर, आणि एकाच पत्त्यावर अनेक कंपन्या आढळून आल्याने गंभीर अनियमिततेचे चित्र समोर आले आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट कर्जात झालेली संशयास्पद वाढ देखील ED च्या तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यातील 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार

NAFA Marathi International Film Festival 2025 : अमेरिकेत 'नाफा'च्या मराठी चित्रपट महोत्सवाला कलाकारांची मांदियाळी

Bin Lagnachi Goshta : निवेदिता सराफ - गिरीश ओक पुन्हा एकदा एकत्र दिसणार; 'बिन लग्नाची गोष्ट'च्या नव्या पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Ration Card : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! सहा महिने वापरलं नाही तर..; सरकारचा मोठा निर्णय