ताज्या बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड

हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे

Published by : Siddhi Naringrekar

हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. पहाटे 4 ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहे. दीड महिन्यात ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे.

ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन तपासणी सुरू केली आहे. 

याच्या अगोदर ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना