कॉंग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांचे मेहुणे आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. नुकतीच ईडीने त्यांची मनी लाँड्रिंगच्या इतर दोन प्रकरणांमध्येही चौकशी केली होती. हरियाणातील शिकोपूर येथील एका भूखंडाच्या व्यवहारात झालेल्या कथित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणा संबंधित, 2008 मध्ये ईडीने सलग दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी केली होती.
त्यानंतर नुकत्याच केलेल्या चौकशीनंतर वाड्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. तसेच या आरोपपत्रांमध्ये काही कंपन्या आणि व्यक्तींची आरोपी तसेच साक्षीदार म्हणूनही नावं दिली जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार वायनाडमधील काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी यांचे पती रॉबर्ट वाड्रा कोणतेही अवैध्य काम केल्यावर नकार दिला आहे.
युकेस्थित शस्त्रास्त्र सल्लागार संजय भंडारी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशी आणि वाड्रा यांच्याशी असलेल्या त्यांच्या कथित संबंधांशी यामधील एक प्रकरण जोडलेलं आहे. इतकचं नव्हे तर ईडीने 2016 मध्ये टाककेल्या दिल्ली छाप्यादरम्यान संजय भंडारी आधीच लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
यादरम्यान आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे अशी की, दिल्लीतील छाप्या आधी लंडनला पळून गेलेला भंडारीने 2009मध्ये लंडनमधील 12-ब्रायन्स्टन स्क्वेअर येथे एक घर खरेदी केलं. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांच्या सांगण्यावरुन त्याने त्या घराचे रीमॉडेलिंग केले. या घराच्या रीमॉडेलिंगसाठी लागणारा खर्च हा वड्रा यांनी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या उलट वड्रा यांनी लंडनमध्ये त्यांची कोणतीही मातमत्ता असण्यास स्पष्ट नकार दिली आहे. त्याचसोबत त्यांनी असा दावा केला आहे की, राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांचा छळ केला जात आहे.