ताज्या बातम्या

अजब ! जगातील महागडा कुत्रा आणि ईडीची चौकशी, मालक हैराण, नक्की प्रकरण काय?

या व्यक्तीच्या चौकशीमधून ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.

Published by : Shamal Sawant

कोणाला कशाचं वेड असेल हे सांगता येत नाही. बंगळुरु येथील सतीश या इसमाने एक कुत्रा खरेदी केला आणि या कुत्र्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचा दावा केला आहे. त्याने केलेल्या दाव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. या सगळ्या प्रकारामुळे आता त्याच्या घरावर आता ईडीनं छापा टाकला आहे. या व्यक्तीच्या चौकशीमधून ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.

सतीशवर परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ईडीने छापा टाकला. सतीशने सर्वात महागडा कुत्रा घेतल्याचे समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानं त्याच्या घरावर छापा टाकला. जर या व्यक्तीच्या दाव्यानुसार त्याने पन्नास कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी केला असेल तर त्याने ते पैसे कसे दिले, त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न ईडीसमोर आहे, त्यामुळे त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली.

मात्र छापा टाकल्यानंतर ईडीसमोर मोठे खुलासे समोर आले आहेत. तपासल्या गेलेल्या माहितीमध्ये पन्नास कोटी रुपयांचे कोणतेही व्यवहार झाले होते. त्यामुळे जर व्यवहार जर केले गेले असतील तर ते हवाला मार्गाने केले असावेत असा अंदाज बांधला जात आहे. त्याचप्रमाणे सतीशने जो कुत्रा खरेदी केला तो कोणत्याही विदेशी प्रजातीचा कुत्रा नसून देशी कुत्रा असल्याचं ही प्राथमिक चौकशीमधून समोर आलं आहे. दरम्यान हा एक अत्यंत दुर्लभ प्राजातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा लांडग्यासारखा दिसतो, अमेरिकेमधून हा कुत्रा आपण खरेदी केल्याचं सतीशने म्हटलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा